काम धंदा

BMC Recruitment 2024 : 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी उत्तम नोकरीची संधी, 81 हजार रुपयांपर्यंत पगार

सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.

Published by : shweta walge

सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कार्यकारी सहाय्यक पदाच्या 1846 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अधिकृत वेबसाइट www.mcgm.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे 10वी उत्तीर्ण उमेदवारही या पदासाठी चांगल्या पगारासह अर्ज करू शकतात. 1846 पदांवरील बंपर भरतीशी संबंधित तपशील या बातमीत पुढे दिला आहे. अर्ज करण्यापूर्वी, एकदा अधिकृत अधिसूचना वाचा.

नाव: कार्यकारी सहाय्यक

एकूण पदे: 1846

सामान्य श्रेणी: 506 पदे

OBC: 452 पदे

EWS: 185 पदे

SC: 142 पदे

ST: 150 पदे

SEBC: 185 पदे

विशेष वर्ग: ED 46 पदे विशेष

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 सप्टेंबर 2024

कोण अर्ज करू शकतो?

18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार ज्यांनी भारतातील मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ते या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ४५ टक्के गुण असलेले पदवीधर उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news