Budget 2022

Budget 2022 | अर्थसंकल्प मोबाईलवर, डाउनलोड करा हे सरकारचं App

Published by : Lokshahi News

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) आज (१ फेब्रुवारी) ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी देखील हा अर्थसंकल्प पेपरलेस (Paperless Budget) असणार आहे. गतवर्षी करोनामुळे कागदपत्रांशिवाय अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी ओमायक्रॉनचं संकट असल्याने यावर्षीही त्याच पद्धतीने अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

अर्थसंकल्प तुम्ही मोबाईल फोनवर (Mobile Phone) देखील पाहू शकता. यासाठी अर्थसंकल्प मंत्रालयाने एक मोबाइल अ‍ॅप आणलं आहे. हे मोबाईल अ‍ॅप अ‍ॅड्रॉईड (Android) आणि आयओएस (IOS) दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. संपूर्ण अर्थसंकल्प या अ‍ॅपवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल.

कसे डाऊनलोड करायचे?

१) युनियन बजेट मोबाईल अ‍ॅप तुम्ही http://indiabudget.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करु शकता.

२) तसेच गुगर प्ले स्टोरवरूनही हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते.

डिजिटल संसद अ‍ॅपवरही मिळणार माहिती

सर्वसामान्य नागरिकांना आता केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती डिजिटल संसद अ‍ॅपवरूनही घेता येणार आहे. या अ‍ॅपवर अर्थसंकल्पाचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाजही लाईव्ह पाहता येईल. १९४७ सालापासून ते आतापर्यंतचे अर्थसंकल्प आणि त्यावरील चर्चा यांची माहिती या अ‍ॅपवर मिळेल.

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

New Zealand Member Of Parliament: कोण आहे न्यूझीलंडची ती तरुण आक्रमक खासदार? जाणून घ्या...

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...