संसदेचे बजेट अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे. संसदेत विरोधक घोषणाबाजी करत आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उल्लेख केला आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपतींनी अभिभाषणात कोरोना काळात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतूक केलं.
संकट कितीही मोठे असू द्या, भारत थांबणार नाही – कोरोना महामारी, पूर, भूकंप, वादळ, बर्ड फ्लू अशी अनेक संकट भारतावर आली . मात्र भारताने या अनेक संकटावर मात केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे
- सरकारने एमएसपीवर कृषी उत्पादन विकत घेत आहे, देशात एनेक एमएसपी केंद्रे निर्माण केले जात आहे
- देशात अन्न-धान्य, फळांचे उत्पादन वाढले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे अभिनंदन
- कोरोना काळात सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केली, कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली.
- ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सरकारने उभारल्या
- गर्भवतींच्या सुरक्षेसाठी सरकार प्रयत्नशील
- कृषी मालांना दिडपट हमीभाव दिला
- 2200 लॅबोरेटरी तयार करण्यापासून पीपीई कीट, मास्कचे मोठ्या प्रमाणात देशात उत्पादन झाले
- नवीन वर्ष नवीन दशकातील पहिलं अधिवेशन
- यंदाचं अधिवेशन खूप महत्वाचं
- आव्हान कीती मोठं असुदे भारत थांबणार नाही
- प्रत्येक संकटावर मात केलं
- 2020 मध्ये अनेक संकट आली
- 2020 मध्ये देशाने अनेकांना गमावलं
- 6 राज्यात गरीब कल्याण योजना राबवली
- आत्मनिर्भर योजनेचं महत्व कोरोनाकाळात वाढलं
- आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 1.5 कोटी लोकांना 5 लाखांपर्यंत मदत मिळत आहे.
- भारतात जगातील सर्वात लसीकरण मोहीम
- सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली
- देशात नव्या 22 एम्स रुग्णालयांना परवानगी
- सरकारने तीन कृषी कायदे पास केले.
- 26 जानेवारीला झालेली दुर्घटना दुर्दैवी
- कृषी कायद्यात शेतकऱ्यांना नवे अधिकार
- देशात आत्तापर्यंत 100 हून अधिक किसान रेल
- वीमा योजनेत शेतकऱ्यांना 90 कोटी
- पंतप्रधान आवास योजनेला सरकारने गती दिली
- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचा प्रयत्न
- कृषी कायद्यांमुळे १० कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ सुरू
- आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतयं
- कोरोना काळानंतर परदेशी गुंतवणूकदार भारतात येण्यासाठी उत्सुक
- भारतात व्होकल टू लोकलला चांगला प्रतिसाद मिळतोय
- आर्थिक संकटावरही देश मात करतोय
- शहरांच्या विकासासाठी विशेष महत्त्व
- अन्नदात्याला उर्जादाता बनवण्याची योजना
- प्रत्येक गावात वीज पोहचवण्याच्या प्रयत्न
- नक्षलवादाला मोठ्या प्रमाणात आळा
- नक्षली परिक्षेत्र कमी होतय
- जल वाहतुकीत बरीच प्रगती झाली
- शेतकऱ्यांच उत्पादन वाढणार
- सरकारला सुप्रीम कोर्टाचा आदर
राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर 16 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. 16 राजकीय पक्षांच्या वतीने आम्ही हे निवेदन जारी करत आहोत असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. या अभिभाषणावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, सपा, आरजेडी, माकप, सीपीआय, आयआयएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ काँग्रेस (एम) आणि एआययूडीएफ यांनी हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिवेशन हे आता दोन विभागात होणार आहे. आज 29 जानेवारी आणि १५ फेब्रुवारी असा या अधिवेशनाचा पहिला टप्पा असणार आहे. १७ व्या लोकसभेच्या पाचव्या अधिवेशनात ३५ बैठका होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात यातील ११ बैठका पार पडतील. तर, दुसऱ्या टप्प्यात २४ बैठका पार पडणार असून आठ मार्च ते आठ एप्रिलपर्यंत या अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे.