Budget 2022

Budget 2022 : जागतिक दर्जाचे शिक्षण दारात: डिजिटल यूनिवर्सिटीची घोषणा

Published by : Lokshahi News

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल विद्यापीठाच्या निर्मितीची घोषणा केली.

शाळा दीर्घकाळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत असल्याचे कारण देत यंदाच्या बजेटमध्ये डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला आहे. 'हब आणि स्पोक' चे नेटवर्क तयार करून डिजिटल विद्यापीठ सर्व प्रादेशिक भाषांमध्ये धडे देईल, अशी घोषणाही मंत्र्यांनी केली. आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ देशातील इतर केंद्रीय विद्यापीठांसोबत काम करेल याशिवाय, ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी इंटरनेट, टीव्ही आणि स्मार्टफोनद्वारे नवीन ई-लर्निंग सामग्री वितरण प्लॅटफॉर्म सुरू केले जातील.

योजनेची घोषणा करताना मंत्र्यांनी "1 वर्ग 1 टीव्ही चॅनेल" वर लक्ष केंद्रित केले. सर्व प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी PM ई-विद्या योजनेंतर्गत स्वयम प्रभा टीव्हीच्या 12 चॅनलवरून 200 पर्यंत विस्तार करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. देशातील तरुणांना सक्षम करण्यासाठी राज्यातील आयटीआयमध्ये नवीन कौशल्य विकास अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत.

कृषी शिक्षणावरही सरकारने भर दिला आहे. नैसर्गिक शेती, झिरो-बजेट शेती, सेंद्रिय शेती आणि आधुनिक काळातील शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यावर अर्थमंत्र्यांनी भर दिला. दरम्यान, सरकारने गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) मध्ये वित्तीय व्यवस्थापन, फिन-टेक, गणित यासह इतर अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी परदेशी विद्यापीठांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे दिग्गज नेते आज महाराष्ट्रात

भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात; विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी

मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 ते 21 नोव्हेंबरला रात्री विशेष लोकल

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप