केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प असून गेल्यावर्षीसारखे यावर्षी देखिल निर्मला सीतारामन या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घरांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील दुर्बलांना परवडणारी घरं देण्यासाठी बजेटमध्ये 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2023 पर्यंत देशामध्ये 80 लाख नवीन घरं बांधणार असं निर्मला सितारामण यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, देशातील दुर्बल घटकांना तसेच केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरं या उद्देशासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 48 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. त्यामध्ये 80 लाख नवीन घरं बांधण्यात येतील. यासोबतच केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. नवीन घर खरेदी केल्यावर, लोकांना सरकारकडून सबसिडी मिळते.