सध्या रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरू असलेला वाद जगभरात चर्चेचा विषय राहिला आहे. दरम्यान, रशियासाठी आजची सर्वात मोठी वाईट बातमी समोर आली आहे. रशियावर जागतिक स्तरावर निर्बंधांचे युग सुरू झाले आहे. युक्रेन संकटादरम्यान, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी पाच मोठ्या रशियन बँकांवर बंदी घातली.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी पुतिन यांच्यावर युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा विपर्यास केला आहे. त्यांनी सैन्य पाठवले आहे, त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा मोडला आहे, त्यांनी मिन्स्क करार नाकारले आहेत आणि युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर करणार्या 1994 च्या बुडापेस्ट कराराची तोडफोड केली असल्याची टीका जॉन्सन यांनी केली आहे.