Vidharbha

धावत्या रेल्वेतून उडी मारुन दोघांची आत्महत्या

Published by : Team Lokshahi

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) दोन मुलींनी अकोल्यात (Akola) धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन (Ural Police Station) अंतर्गत येणाऱ्या मनारखेड़ रेल्वे चौकी (Manarkhed railway station) परिसरातील आहे. बुधवारी रात्री या दोनहि मुलींनी मुंबई-कलकत्ता (Mumbai-Calcutta) रेल्वेतून पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. या दोनहि मुली छत्तीसगड़ येथील रहिवासी असून रागाच्या भरात त्यांनी घर सोडले होतं. मात्र आत्महत्या मागील नेमकं कारण अद्याप कळू शकेल नाही, पुढील तपास अकोला पोलीस करीत आहे.

प्राप्त माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड़ रेल्वे चौकी परिसरात १९ वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. अकोल्यातील उरळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी (postmortem) पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. तपासा दरम्यान, दोनहि मुलींची ओळख समोर आली आहे. कुमारी बेबी राजपुत (Miss Baby Rajput) (वय १९, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) आणि कुमारी पूजा गिरी (Kumari Pooja Giri) , (वय १९, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) असं या मुलींचे नावे आहे. या मुलींनी चार दिवसांपूर्वी आयटीआय'ला ( ITI ) जातो असे सांगून घरून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाही. त्यांचा शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. अखेर, त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलिस स्टेशन (Chapa Police Station) गाठले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या दोनहि मुलींनी मुंबई-कलकत्ता रेल्वे'मध्ये प्रवासात आपली जीवनयात्रा संपवली. असे असले तरी प्रकरण नेमके काय आहे, हे पोलिस तपासाअंतीच समोर येणार आहे. अधिक तपास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर करीत आहे.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-कलकत्ता रेल्वे'मध्ये पूजा आणि बेबी हे प्रवास करीत असताना, दोघींनी रेल्वेतून पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. यावेळी दोन्ही मुली आयटीआयच्या गणवेशात असून आयटीआय'मध्ये कोपा'चं शिक्षण सुरु होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपा'ची ऑनलाइन परीक्षा (Online exam) दिली. दरम्यांन, या दोन्ही मुलींच्या आत्महत्या नेमकं कारण अद्याप पर्यत कळू शकले नाही.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news