कोरोना प्रतिबंधक फायझर किंवा मॉडर्ना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना आता बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे. ८ महिन्यांनी लशीचा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. सप्टेंबरच्या आधी बूस्टर डोसचं लसीकरण सुरु करण्याचा बायडेन प्रशासनाचा विचार असल्याचं कळतय. अमेरिकेत रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे.
त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या सल्लागार समितीत बूस्टर डोसच्या लसीकरणावर चर्चा झाली. त्यावेळी बूस्टर डोसच्या बाजूनं सल्लागारांनी मतदान दिलं. त्यामुळे आता बायडेन प्रशासनही बूस्टर डोसबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.