International

पाकिस्तानात मिरवणुकीत दरम्यान बॉम्बस्फोट

Published by : Lokshahi News

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर येथे गुरुवारी मोठा स्फोट झाला. शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या कडेला हा स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Bomb blast in shia muslim procession in pakistan many wounded)

माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंत, स्फोटात जखमी झालेले लोक रस्त्याच्या कडेला बसून मदतीची वाट पाहत असल्याचे दिसते.

शहर पोलीस अधिकारी मोहम्मद असद आणि शिया नेता खावर शफाकत यांनी या स्फोटांना दुजोरा दिला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, शहरातील तणाव लक्षणीय वाढला आहे. शिया समाज हल्ल्यानंतर बदला घेण्याची मागणी करत आहे .

Latest Marathi News Updates live: नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे