India

भाजपला मोठा धक्का; आमदार प्रवीण झांटेंचा राजीनामा

Published by : Lokshahi News

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाला धक्क्यावर धक्के बसायला सुरूवात झाली आहे. आता आमदार प्रवीण झांटे (MLA Pravin Zantye)यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात प्रवेश करणार आहे. मायेम मतदारसंघाचे आमदार प्रवीण (MLA Pravin Zantye) हे भाजप सोडणारे दुसरे नेते आहेत.

गोव्यामध्ये येत्या 14 फेब्रुवारीला मतदान आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपला गळती सूरू झाली आहे. आमदार प्रवीण झांटे (MLA Pravin Zantye) यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. झांटे यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते पक्षातून देखील बाहेर पडले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यापूर्वी गोव्याचे भाजपा मंत्री मायकल लोबो यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. प्रवीण झांटे (MLA Pravin Zantye)यांच्यासह आतापर्यंत भाजपाच्या चार आमदरांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये कार्लोज, अल्मेडिया, एलिना सालदना, मायकल लोबो आणि प्रवीण झांटे यांच्या नावाचा समावेश आहे. हे सर्व आमदार पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Latest Marathi News Updates live: उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काहीच वेळात मतदान यंत्र वाटपाला होणार सुरुवात

Mumbai Voting Booths : मुंबईत 76 क्रिटीकल मतदान केंद्र | कुठे, किती मतदान केंद्र क्रिटीकल?

Delhi Pollution: राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे संकट गंभीर; अनेक भागात AQI 500 पार

'चक्रीका' अ‍ॅप ठेवणार मतदान केंद्रांवर लक्ष; नेमकं काय आहे 'हे' अ‍ॅप

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान