Mumbai

Video | राऊत, रश्मी ठाकरेंनी लिहिलेली पत्रं सोमय्यांकडून सादर, काय आहे पत्रात?

Published by : Shweta Chavan-Zagade

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत, संजय राऊत पहिले, तर सचिन वाझे (sachin waze) शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते आहे, असे वक्तव्य केले.

तसेच शिवसेने पाठवलेल्या पत्राचं वाचन किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली. "पत्र रश्मी ठाकरे यांनी पाठवलं असलं तरी त्यात भाषा उद्धव ठाकरे यांची आहे. कारण उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय रश्मी ठाकरे पत्र लिहिणार नाहीत. या पत्रावर सरपंचांची सही आहे. यावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना पत्नीची बाजू घ्यायची नाही काय? मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. ते जनतेची फसवणूक करत आहेत, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला.

"रश्मी ठाकरे यांनी केलेल्या जमीन व्यवहारावर उद्धव ठाकरे बोलत नाहीत. ते सरपंचांना पुढे करत आहेत. या प्रकरणी करण्यात असलेल्या आरोपांवर बोलण्याची शिवसेनेच्या एकाही नेत्याची हिम्मत नाही. शिवसेच्या नेत्यांध्ये फक्त स्पर्धा लागल्याचा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.

संजय राऊत  यांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी किरीट सोमय्या यांना पत्र पाठवलं होतं. त्याचां वाचनही किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केलं. "शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या तोंडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी यावेळी केली आहे. सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. याबरोबरच संजय राऊत यांनी वापरलेल्या भाषेबाबत सोमय्या आक्रमक झाले.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय