चार राज्यात भाजपने तर पंजाबमध्ये तर आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) विजय मिळवला. त्यानंतर आता भाजपकडून (bjp)चारही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करण्या आली. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चारही राज्यात भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान मुख्यमंत्र्यांवरच विश्वास व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेश – योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपनं पुन्हा एकदा यश मिळवलं. या राज्यात भाजपची सत्ता आल्यास योगी आदित्यनाथ हेच मुख्यमंत्री होणार हे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. आता योगींचा शपथविधी 25 मार्चला होणार आहे. योगींच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अनेक केंद्रीय कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत.
गोवा – प्रमोद सावंत
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपनं पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवलं. परंतु यावेळी विश्वजीत राणे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा समोर आल्यानं गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत पेच निर्माण झाला होता. अखेर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे विश्वजीत राणे यांनीच प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.
उत्तराखंड – पुष्कर सिंह धामी
उत्तराखंडमध्ये भाजप कुणाच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदीचा जबाबदारी देणार याकडे राज्यकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याच गळ्यात भाजपनं पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. या राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुष्कर सिंह धामी, सतपाल महाराज, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक, खासदार अनिल बलूनी यांची नाव चर्चेत होती.
मणिपूर – एन बीरेन सिंह
एन बिरेन सिंह यांनी सोमवारी दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मणिपूर भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एन बिरेन सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. महत्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही धामी यांच्यावर भाजपनं विश्वास ठेवलाय.