India

‘त्या’ लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही; जेष्ठ खगोल अभ्यासक दा कृ. सोमण यांचा दावा

Published by : Lokshahi News

अनेक दिवसांपासून पृथ्वीवर लघुग्रहामुळे मोठं संकट येणार असल्याचे सांगितले जात आहे. लघुग्रह हे अवकाशात पृथ्वीभोवती फिरत असतात. आतापर्यंत एकदाच लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याचे म्हटले जाते. यामुळे जगातील डायनासोर नष्ट झाले होते. तेव्हापासून अनेक लघुग्रह पृथ्वी जवळून गेले आहेत पण सुदैवाने अजूनही लघुग्रहाची पृथ्वीसोबत टक्कर झालेली नाही. मात्र आता १८ जानेवारीला आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह पृथ्वाच्या खूप जवळून जाणार आहे. या लघुग्रहाला नाव ७४८२ (1994 PC1) असे देण्यात आहे. या सर्व प्रकारावर आता जेष्ठ खगोल अभ्यासक दा कृ. सोमण यांनी 'त्या' लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नसल्याचा दावा केला आहे.

७४८२ ( १९९४ पीसी वन ) हा लघुग्रह १८ आणि १९ जानेवारी रोजी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असल्याची बातमी सर्वत्र पसरवली गेली आहे, त्यात काहीही तथ्य नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचे जेष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. लोकांनी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचे सांगत सोमण यांनी १.१ किमी व्यासाचा हा लघुग्रह पृथ्वीपासून १९ लक्ष ८१ हजार ४६८ किमी. अंतरावरून जाणार आहे. हे अंतर पृथ्वी-चंद्र अंतराच्या साडेपाचपटीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही नसल्याचे सोमण यांनी म्हटलं आहे.

७४८२( १९९४ पीसीवन ) या लघुग्रहाचा शोध ९ ॲागस्ट १९९४ रोजी रॅाबर्ट मॅकनॅाट यांनी स्लाइडिंग स्प्रिंग वेधशाळेतून लावला. हा लघुग्रह ५७२ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. मात्र कधी कधी तो पृथ्वीच्या जवळून जातो. १७ जानेवारी १९३३ रोजी तो पृथ्वीजवळून गेला होता. आता यानंतर १८ जानेवारी २१०५ रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे. अशाप्रकारे पृथ्वीजवळून भ्रमण करणाऱ्या हजार लघुग्रहांचा तपशील शास्त्रज्ञांना मिळाला आहे.

एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार हे अगोदर समजल्यास त्याचा मार्ग बदलणे किंवा तो आदळण्यापूर्वीच त्याचे तुकडे करणे हे लवकरच शक्य होणार आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे किंवा चिंता करण्याचे काहीच कारण नाही. १९०८ मध्ये रशियातील तुंगस्का परिसरात ६० मीटर व्यासाची अशनी पृथ्वीवर आदळली होती. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको युकातान प्रदेशात १० किमी व्यासाची अशनी आदळल्यामुळे डायनासॅार नष्ट झाले होते. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांबीचा २० लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण भारतात लोणार येथे आदळला होता. यावेळी हा लघुग्रह पृथ्वीपासून खूप दुरून जाणार असल्याने तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसल्याचे अनेक शास्त्रज्ञांचे मत असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. कोणतीही भीती बाळगू नये असे जेष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती