जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. EPFOद्वारे नोकरदार लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या अंतर्गत आता EPFO आता तुम्हाला संपूर्ण 7 लाख रुपयांचा लाभ देत आहे. जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागेल, त्यानंतरच या योजनेचा लाभ घेता येईल.
पीएफ आणि पेन्शन व्यतिरिक्त, कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) त्याच्या सदस्यांना जीवन विम्याचा लाभ देखील देत आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला 7 लाख रुपयांचा लाभ मिळतो. विशेष गोष्ट म्हणजे ही सुविधा ग्राहकांना मोफत उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही योगदान आवश्यक नाही.
ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ईपीएफचे सर्व ग्राहक कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना, 1976 (EDLI) अंतर्गत येतात. EDLI योजनेअंतर्गत, प्रत्येक EPF खात्यावर 7 लाख रुपयांपर्यंतचे विनामूल्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. जर सदस्य कोणत्याही नॉमिनीशिवाय मरण पावला, तर क्लेम प्रक्रिया करणे कठीण होते. त्यामुळे जर तुम्ही ते केले नसेल, तर ऑनलाइन माध्यमातून ते कसे करावे हे जाणून घ्या.
जाणून घ्या कशा प्रकारे करता येईल ई-नॉमिनी