कोणत्याही अर्थसंकल्पाचा उद्देश जनतेचा तसेच बाजारपेठेचा विश्वास टिकवून ठेवणे असतो. यंदाचा अर्थसंकल्प प्रचंड आशावादी किंवा प्रचंड निराशावादी नसावा. यंदाच्या संकल्पात काळजीपुर्वक खर्च करण्यावर भर देण्यात यावा.
भारताच्या अर्थव्यवस्थेला कोरोना महामारीमुळे जबरदस्त फटका बसला आहे, त्यामूळे अर्थव्यवस्थेमध्ये तयार झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी आता सरकारने खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. ह्याच एका मार्गाने अर्थव्यवस्था सुरळीत करता येईल.
कोरोना महामारीमुळे मोठ्या कंपन्यांपेक्षा लहान व्यवसाय आणि उद्योगांवर खूप जलद गतीने परिणाम झाला आहे. हे क्षेत्र कोरोनाने अधिक प्रभावित केले आहे. लहान आणि मध्यम क्षेत्र आणि सर्वसामान्य यांवर झालेला परिणाम यावरही सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे राजन यांनी सांगितले आहे.