लोकशाही न्यूज नेटवर्क | 1 मार्च 2021 नंतर तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही. कारण काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देना बँक आणि विजया बँक विलीनीकरण करण्याचे स्पष्ट केले होते. यानंतर या दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदामधील ग्राहक झाले. यामुळे 1 तारखेपासून दोन्ही बँकेचे IFSC कोड बंद आहेत.
IFSC कोड बदलल्यानंतर ग्राहक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. याबाबत बँकेने पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. कोड बंद झाल्यानंतर याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. कारण, कुठल्याही ऑनलाईन व्यवहारासाठी IFSC कोड लागतो.