शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंना यांना जामीन मंजूर झाला आहे. नितेश राणेंना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे.
नितेश राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि शेवटी ते सेशन्स कोर्टापर्यंत आलं. अनेक राजकीय तसच कोर्टातल्या घडामोडीनंतर नितेश राणेंना जामीन मंजूर केला गेलाय. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटीशर्ती घातल्या आहेत. नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणेंची तब्येतही खालवली आहे. आज सकाळी तर त्यांना उलट्याचा त्रास होत असल्याचीही माहिती आली होती. त्यापार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अखेर कोर्टानं जामीन मंजूर केलाय. नितेश राणेंसाठी आणि एकूणच राणे कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. आहे. नितेश राणेंना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे.