India

Australia science | ऑस्ट्रेलियन विद्यार्थीने कोळंबीच्या कवचांपासून बनविलेले मजबूत बायोडिग्रेडेबल प्लास्टिक

Published by : Lokshahi News

एका ऑस्ट्रेलियन विद्यार्थीने कोळंबीच्या कवचांपासून एक हलके प्लास्टिक तयार केले आहे. जे 30 दिवसांत थोड्या वेळाने नैसर्गिकरीत्या विघटन होते. दक्षिण ऑस्ट्रेलियामधील फ्लिंडर्स विद्यापीठात पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या अँजेलिना अरोराने न्यू साउथ वेल्समधील सिडनी गर्ल्स हायस्कूलमध्ये असतानाच प्रयोग सुरू केले होते.

नववीत असताना अरोराला एक विज्ञान प्रकल्प सोपविण्यात आला होता. म्हणूनच, तिने स्थानिक मार्केटला भेट दिली. तेथे प्लास्टिकमुळे होणारा पर्यावणाला त्रास जाणवला. प्लास्टिकसाठी पर्यायी वातावरण तयार करणे आणि विशेषतः पर्यावरणसाठी काहीतरी चांगले प्रयत्न करण्याचा विचार केला.

पृथ्वीला प्लॅस्टिकच्या समस्येतुन मुक्त करणे. प्लास्टीक एक संकट आहे जे निसर्गाच्या इतर समस्ये पेक्षा तीन पट आहे. म्हणुन प्रथम आपल्या समुद्र, नद्या आणि भूभागांमध्ये टाकलेले सर्व प्लास्टिक काढून टाकणे आवश्यक आहे.व त्यांना शोधुन पर्यावरणाला हानी न पोहचवता त्यांची योग्य रित्या विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

अरोराने स्वत: ला बायोप्लास्टिक तयार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आणि कोळंबीचे कवच आणि बटाटाच स्टार्चपासून प्लास्टिक बनवण्याची सुरुवात केली, परंतु हे पाण्यामध्ये विद्रव्य होते आणि कचरा उत्पादनांनी बनविलेले नव्हते. मग केळीच्या सालासारख्या विविध प्रकारच्या सेंद्रिय कचर्‍याचा प्रयोग केला.

अरोरा एकदा तिच्या स्थानिक माशांच्या दुकानात गेल्यानंतर तिला कोळंबीचे कवच आणि प्लास्टिकमधील साम्य लक्षात आल्यावर ती कोळंबीकडे वळली.
तिच्या सुरुवातीच्या यशांमुळे ऑस्ट्रेलियामधील विद्वान आणि शास्त्रज्ञांचे लक्ष तिच्याकडे वळले. "सुरुवातीच्या प्रकल्पांमुळे, मि राष्ट्रीय व राज्य स्पर्धा जिंकल्या आणि माझे संपर्क वाढविणे आणि विविध कार्यक्रमांमध्ये जाणे मला कसे शक्य झाले? मि विद्यापीठाच्या प्रयोगशाळा आणि बरेच अत्याधुनिक उपकरणे वापरण्यास सक्षम होते, " असे अरोराने फोर्ब्सने सांगितले.

मग तिने कोळंबीच्या कवच रचनेचा अभ्यास केला आणि त्यातून चिटिन काढला. लॉबस्टर, कोळंबी आणि क्रॅब शेल्स सारख्या क्रस्टेसियन कवचामध्ये आढळणारा हा कार्बोहायड्रेट आहे. हे बर्‍याच कीटकांमध्ये देखील आढळते. अरोराने रेशमी किड्यात सापडलेल्या फायब्रोइनबरोबर एक अघुलनशील प्रथिने एकत्र केली. ती म्हणाली, "दोघांना एकत्र करून आणि थोडीशी रासायनिक प्रक्रिया करून मी प्लास्टिकसाठी एक नमुना तयार करण्यास सक्षम होते,"

तिला मिळालेल्या यशानंतर बर्‍याच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन बनलेल्या प्लास्टिकमध्ये रस व्यक्त केला आहे आणि अरोराकडे अनेक पेटंट्स बाकी आहेत पण आत्ता तरी ती तिच्या वैद्यकीय पदवीवर लक्ष केंद्रित करत आहे असे तिने सांगितले.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती