पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (assembly election result 2022) आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. (Assembly Election 2022 Results)
https://lokshahi.live/assembly-election-result-2022-goa-and-panjab-result/
पाच राज्यांत आज मतकौल; उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये कोण मारणार बाजी? प्रचंड उत्कंठा
- मी माझ्या लढतीवर समाधानी आहे. पण निकालामुळे थोडा निराश आहे: उत्पल पर्रीकर, पणजी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, पणजी, गोवा
- Goa Election Live Result Today : गोव्यात उत्पल पर्रीकरांचा पराभव, भाजपने मारली बाजी
- Uttarakhand Election Live Result Today : उत्तराखंडमधील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्ष ४४ जागांवर पुढे आहे, तर काँग्रेसने २२ जागांवर आघाडी घेतली आहे.
- Punjab Election Live Result Today : पंजाबच्या ट्रेंडमध्ये AAP ला प्रचंड बहुमत मिळाल्याबद्दल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, पंजाबच्या लोकांनी केजरीवाल यांच्या कारभाराच्या मॉडेलला संधी दिली आहे. आज हे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित झाले आहे. हा सर्वसामान्यांचा विजय आहे.
- Goa Election Live Result Today : गोव्याच्या निवडणुकीत भाजपची आघाडी, प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदी कायम राहणार?
- गोव्यात भाजपला बहुमत मिळाल्याबद्दल भाजप नेते विश्वजित राणे म्हणाले की, आम्ही गोव्याच्या निवडणुकीत स्वीप करू. भ्रष्ट आणि बाहेरच्या लोकांना जनतेने नाकारले आहे. गोव्यासाठी काम करणाऱ्या पक्षाला त्यांनी मतदान केलं आहे. प्रमोद सावंत होणार मुख्यमंत्री? या प्रश्नावर राणे यांनी पक्ष हायकमांडच निर्णय घेईल असं म्हटलं आहे.
- उत्तराखंडमधील सर्व ७० जागांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्ष ४३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २१ जागांवर, तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये बहुमताचा आकडा ३६ आहे आणि भारतीय जनता पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा ७ जागांवर आघाडीवर आहे. खतिमा येथून पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आता पुढे आहेत.
- Manipur Election Live Result Today : मणिपूरमधील ६० जागांपैकी भाजप १७ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६ जागांवर पुढे आहे. एनपीपी ४ जागांवर आघाडीवर आहे. NPF ३ आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे.
- Punjab Election Live Result Today : सोनू सूदची बहीण मालविका सूद पंजाबमधील मोगा येथून पिछाडीवर आहे. जलालाबाद सुखबीर सिंग बादल, प्रकाशसिंग बादल पिछाडीवर आहेत. धुरीतून 'आप'चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भगवंत मान आघाडीवर आहेत.
- Punjab Election Live Result Today : अमृतसरमध्ये देखील आपची आघाडी, नवज्योत सिंग सिद्धी पिछाडीवर
- Election Live Result Today : तीन राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमधील मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, प्रमोद सावंत आणि चरणजितसिंग चन्नी आपापल्या जागेवरून पिछाडीवर आहेत. मात्र, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप बहुमताच्या जवळपास पोहोचला आहे. गोव्यातही भाजप इतर पक्षांच्या तुलनेत आघाडीवर आहे.
- Goa Election Live Result Today : गोव्यात भाजप आघाडीवर आहे. आतापर्यंत ४० पैकी २५ जागांचे ट्रेंड आले आहेत. यामध्ये भाजप १३, काँग्रेस ५ आणि आम आदमी पार्टी १ जागेवर पुढे आहे. टीएमसी आघाडी २ जागांवर तर इतर ४ जागांवर आघाडीवर आहे.
- Uttarakhand Election Live Result Today : उत्तराखंडमध्ये भाजप २९, काँग्रेस १५ जागांवर पुढे आहे. आम आदमी पार्टीने अद्याप खातं उघडलं नसून इतर २ जागांवर आघाडीवर आहे.
- Punjab Election Live Result Today : प्रकाशसिंग बादल पंजाबमध्ये पिछाडीवर आहेत. पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल आपल्या जागेवर पिछाडीवर आहेत. आम आदमी पक्षाने आता ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने ७ तर अकाली दलाने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप आघाडी ३ तर इतर १ जागेवर आघाडीवर आहे.
- Punjab Election Live Result Today : अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका मोगा पिछाडीवर आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियालामधून पिछाडीवर आहेत.
- Goa Election Live Result Today : मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर पिछाडीवर
- गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर त्यांच्या जागेवर पिछाडीवर आहेत. गोव्यात तीन जागांचे ट्रेंड आले असून भाजप १ वर तर इतर २ जागांवर पुढे आहेत.
- Manipur Election Live Result Today : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी श्री गोविंद मंदिरात प्रार्थना केली. त्यांच्यासोबत भाजप नेते संबित पात्राही उपस्थित होते.
- Uttarakhand Election Live Result Today : उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये लढत
- उत्तराखंडमध्ये १७ जागांचे ट्रेंड आले आहेत. भाजप ९ जागांवर तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. इतर १ जागेवर पुढे आहेत
- Election Live Result Today : मणिपूरमध्ये भाजप आघाडीवर, गोव्यात अपक्ष आघाडीवर
- मणिपूरमधून आलेल्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप १ जागेवर पुढे आहे. गोव्यात दोन जागांचे कल आले असून दोन्ही जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत.
- Punjab Election Live Result Today : पंजाबमध्ये चुरशीची लढत, आतापर्यंत काँग्रेस पुढे
पंजाबमध्ये काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी ३ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप २ जागांवर, शिरोमणी अकाली दल २ जागांवर आघाडीवर आहे. - Punjab Election Live Result Today : प्रतापगडमधून कृष्णा पटेल पिछाडीवर आहेत. पंजाबमधील चमकौर साहिबमधून चरणजीत सिंह चन्नी आघाडीवर आहेत.
- Goa Election Live Result Today : गोव्यात अपक्ष उमेदवार आघाडीवर पाहायला
- यूपीत आता भाजप १०० जागांवर आघाडीवर, तर समाजवादी पक्ष जवळपास ८० जागांवर आघाडीवर
- Punjab Election Live Result Today : प्रतापगडमधून कृष्णा पटेल पिछाडीवर आहेत. पंजाबमधील चमकौर साहिबमधून चरणजीत सिंह चन्नी आघाडीवर आहेत.
- Goa Election Live Result Today : गोव्यात अपक्ष उमेदवार आघाडीवर पाहायला मिळत आहेत.
- Uttarakhand Election Live Result Today : उत्तराखंडमध्ये काँग्रेस ६ जागांवर तर भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे.
- Punjab Election Live Result Today : पंजाबमधील ११७ जागांपैकी कल येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस ४ जागांवर तर आम आदमी पार्टी ३ जागांवर पुढे आहे. अकाली दल एका जागेवर पुढे आहे.
- उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी लढत आहे. भाजप ७ जागांवर तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे.
- Punjab Election Live Result Today : पंजाबमध्ये भाजप आघाडी ३ आणि काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे.
- Punjab Election Live Result Today : भगवंत मान यांनी गुरुद्वारात केली प्रार्थना, विजयी होणार असल्याचा विश्वास
- Manipur Election 2022 Results Live: मणिपूरमध्ये 8 वाजता मतमोजणीला सुरुवात
- गोव्यात उत्पल पर्रीकर आघाडीवर
- गोव्यात कॉंग्रेस 20 जागांवर आघाडीवर
- उत्तर प्रदेशात पहिल्या कलांमध्ये भाजपची 'सेंच्यूरी'
- उत्तर प्रदेशात भाजपा ३२ जागांवर आघाडीवर
- मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपा ३२ जागांवर आघाडीवर आहे.
- गोव्यात काँग्रेस पूर्ण तयारीत, निवडणूक निकालापूर्वीच मागितली राज्यापालांकडे वेळ
- कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी गोव्यात मांडले ठाण. निकालानंतर दगाफटका रोखण्यासाठी लावली फिल्डिंग.
- कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी गोव्यात मांडले ठाण. निकालानंतर दगाफटका रोखण्यासाठी लावली फिल्डिंग.
- पंजाब: मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन केली प्रार्थना. चमकौर साहिब आणि भदौड अशा दोन मतदारसंघातून चन्नी लढवताहेत निवडणूक.
- पंजाब: आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या घरी निकालाआधीच जल्लोष.
- पंजाब: एक्झिट पोलच्या निष्कर्षामुळं आम आदमी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण
- पंजाबमध्ये ११७ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
- गोव्यात ४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान
- मणिपूरमध्ये ६० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले
- उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान, ४०३ जागांसाठी मतदान
- सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात
- कुठे किती जागा
उत्तर प्रदेश: 403
• पंजाब: 117
• उत्तराखंड: 70
• गोवा: 40
• मणिपूर: 60