India

हेलिकॉप्टर अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी

Published by : Lokshahi News

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत आतापर्यंत 13 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकजण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी झाले आहेत. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्यापतरी समोर आली नाही.

तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे. हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. माहितीनुसार बिपिन रावत एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेत आतापर्यंत 13 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकजण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी