सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑल्मिपिक मधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलय. टोक्यो ऑल्मिपिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. भारतानं .या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरजचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
पात्रता फेरीत टॉपर राहिलेल्या नीरज चोप्राने फायनल इवेंटमध्ये पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत 87.58 मीटर भाला फेकून प्रतिस्पर्धांना आणखी मागे टाकले. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला. चौथ्या प्रयत्नात तो फेल त्याची भाला फेक फॉल ठरली.