कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. मात्र महापालिकेने नुकत्याच केलेल्या तिसऱ्या सेरो सर्व्हेक्षणातून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ६ ते १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्ये सरासरी ५१.१८ टक्के अँटीबॉडिज असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आलंय.
मुंबईतील एकूण २४ वॉर्डमध्ये मे आणि जून या महिन्यांमध्ये ६ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात एकूण १० हजार मुलांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्याच्या तपासणीअंती त्यातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली. हे मुंबईकरांसाठी मोठे दिलासादायक मानले जातंय.