Business

एमजी डेव्हलपर प्रोग्राम अँड ग्रँटच्या तिसऱ्या सीझनची घोषणा

Published by : Lokshahi News

एमजी मोटर इंडियाने आपल्या सहयोगी सदस्यांसोबत स्टार्टअप इंडिया आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहयोगाने एमजी डेव्हलपर प्रोग्राम आणि ग्रँट- या वार्षिक स्तरावरील इनोव्हेशन प्रोग्राम पुन्हा एकदा आणला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील मोबिलिटी क्षेत्राच्या मजबूतीकरणासाठी तंत्रज्ञानातील स्टार्टअप्सना नवीन, तंत्रज्ञानदृष्ट्या अद्ययावत अ‍ॅप्लिकेशन्स आणि अनुभव आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आहे.

एमजी डेव्हलपर प्रोग्राम अँड ग्रँटच्या तिसऱ्या सीझनची संकल्पना कार अॅज ए प्लॅटफॉर्म (सीएएपी) या विषयाभोवती असून ती कार अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवणारे मोबिलिटीचे भवितव्य आहे. या नवीन युगाच्या नवप्रवर्तनाला अधिक चालना देण्यासाठी एमजी मोटर इंडियाने सीएएपीवर एक सखोल व्हाइट पेपर प्रकाशित केला आहे. त्यातून या भविष्याधारित तंत्रज्ञानासाठी गेम चेंजिंग अ‍ॅप्लिकेशन्स प्रदर्शित केले जातील. या सहयोगातील भागीदार जिओ, सॅप, एडोब, कोइनअर्थ, एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, मॅपमायइंडिया आणि बॉश इत्यादी आहेत.

एमजी मोटार इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले की, "एमजीमध्ये आम्ही विश्वास ठेवतो की, सहयोग ही बदलाची गुरूकिल्ली आहे. आम्ही यापूर्वी विविध स्टार्टअप्ससोबत भागीदारी केली असून त्यातून अनेक यशोगाथा तयार झाल्या आहेत. आमचा विश्वास आहे की, सीएएपीकडे मोबिलिटीची पुनर्व्याख्या करण्याची क्षमता आहे. त्यामुळे एमजी डेव्हलपर प्रोग्राम आणि ग्रँट ३.० मध्ये आम्ही उद्योगातील सर्व भागधारकांना या क्रांतिकारी संकल्पनेच्या विकासात योगदान देण्यासाठी आमंत्रित करत आहोत."

इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपक बागला म्हणाले की, "भारत ही जगातील चौथ्या क्रमांकाची वाहनांची बाजारपेठ आहे आणि २०२६ पर्यंत आकारमानाच्या स्वरूपात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ होईल, अशी अपेक्षा आहे. हा उपक्रम जागतिक अर्थव्यवस्थेत सातत्यपूर्ण शक्तीसाठी भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात नवप्रवर्तनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे."

स्टार्टअप इंडिया आणि इन्व्हेस्ट इंडिया हे सरकारकडून पाठिंबा मिळालेले उपक्रम आहेत, ज्यातून स्टार्टअप्सना सुलभीकरणासाठी व मदतीसाठी सक्षमीकृत केले जाते, वित्तपुरवठ्याची आणि सवलतींची मदत केली जाते. त्यातून भारतात गुंतवणुकीच्या संधी आणि पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांनाही मदत केली जाते.

एमजी स्टार्टअप्स, विकासक किंवा व्यक्तींचा तीन वर्गवारींअंतर्गत सहभाग आमंत्रित करत आहेः वापर (लोकेशन ट्रॅकिंग, जीपीएस नेव्हिगेशन, सर्च, पेमेंट), सिक्युरिटी (कार आणि वाहनचालकांचे अ‍ॅनालिटिक्स), आणि मनोरंजन (गेम्स, म्युझिक इत्यादी.) एमजीडीपीच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये ऑटोमेकरने ५०० पेक्षा अधिक स्टार्टअप्ससोबत संवाद साधला होता.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...