अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Worker Strike)विलनीकरणाचा मुद्दा मार्गी लागला नाही. ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला आज धक्का बसला. सरकारने ४१ टक्के पगारवाढ दिली आहे. यापुढे सरकार काहीच देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांचं विलीकरण आता अशक्य असल्याचं विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांनी सांगितले.
अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा विलनीकरणाचा मुद्दा मार्गी लागला नाही. कर्मचाऱ्यांचा संप (ST Worker Strike) अजूनही सुरूच आहे. हा संप कधी मिटणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याबाबतच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विधानसभेत उत्तर दिलं. त्यात त्यांनी विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितले. यावर राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एसटी विलीनीकरणावर 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश काल उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 रोजी ठेवली होती.