Crime

अमरावतीचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला,हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

Published by : Lokshahi News

अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार तसेच जिल्हा बँक निवडणुकीतील सहकारी पॅनलचे सदस्य वीरेंद्र जगताप यांच्या घरावर आज सकाळच्या सुमारास काही तरुणांनी दगड फेक आणि घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याने घडली. या हल्ल्याबद्दल माजी आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले की, सदर हल्ला हा प्रहारच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. या निवडणुकीत सहकार पॅनलने यश संपादन केले. याच यशाचा जल्लोष करत असताना काही कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने कालपासूनच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यात येत होता.दरम्यान येथे हल्ला होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी वर्तवली होती.आणि या घटनेच्या आधारावर आज सकाळी चांदूर रेल्वे मतदार संघातील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर काही तरुणांनी दगडफेक करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याबद्दल माजी आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले की, सदर हल्ला हा प्रहारच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा हल्ला जाणीवपुर्वक घडून आणला.अशाप्रकारे हल्ला होऊ शकतो अशी माहिती आम्ही पोलिसांना आधीच दिली होती. परंतु, पोलिसांनी त्या माहितीचे गांभीर्याने घेतले नाही आणि पोलिसांनी ज्या दोन तरुणांना पकडले आहेत ते प्रहारचे कार्यकर्ते असून त्यांना बच्चू कडू यांचे सारखे फोन येत आहे, वाटल्यास सीडीआर तपासून पोलिसांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण