India

हेल्मेट न घातल्यामुळे ट्रक चालकावर कारवाई

Published by : Lokshahi News

ओडिशामध्ये हेल्मेट न घालता ट्रक चालवणाऱ्या व्यक्तीचे 1 हजार रुपयांचे चलन कापण्यात आले असून, ओडिशामध्ये परिवहन विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. ओडिशाच्या गांजाम जिल्ह्यात हा प्रकार घडला. ड्रायव्हर प्रमोद कुमार हे ट्रकच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओला पोहोचले तेव्हा आपण ट्रक चालक आहोत मग हे चलान का कापले ? अशी विचारणा प्रमोद यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. हा प्रकार उघडकीस आला. परिवहन विभागाने दुर्लक्ष करूनही ट्रक चालकाला चलानचे पैसे जमा करावे लागले. ही सर्व घटना अचंबित करणारी होती.

चलान जमा केल्यावरच परमिटचे नूतनीकरण होईल असे अधिकारी म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून मी ट्रक चालवत असून ट्रकद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम करतो. ट्रकचा परमिटचे नूतनीकरण करणे आवश्यक होते म्हणून मी तिथे गेलो असता हा प्रकार समजला असे प्रमोद सांगतात. परंतु परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही आणि सक्तीने 1000 रुपयांचे चलान प्रमोद यांना भरावे लागले. असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, अशी प्रतिक्रिया प्रमोद यांनी दिली आह

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news