अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ घेता येणार. 1 लाख 98 हजार शेतकऱ्यांना मिळणार पिक विम्याचा लाभ घेता येणार. शेतकऱ्यांना 43 कोटी 65 लाखांचा पीक विमा मिळणार आहे. कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विम्या कंपन्यांनी 1 लाख 98 हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं होतं. आमदार संदीप धुर्वेंच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं.
यवतमाळमध्ये पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या जिल्ह्यातील एक लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक घेतली.
त्या जिल्ह्यातील अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना 43 कोटी 65 लाख 75 हजार रूपये अदा करण्याचा आदेश झाला. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे केव्हा येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.