शेतकरी नेते रविकांत तुपकर आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी शेतकरी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारणार असल्याचं तुपकर यांनी सांगितल आहे.
कापूस सोयाबीन पिकाला हमीभाव नाही. सरकार कर्जमाफी आणि पीक विमा बाबत नाव घेत नाही. सोयाबीनला 4892 रुपये जो हमीभाव देण्यात आला. तो मान्य नाही. खाजगी बाजार पेठेत सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा. तर कापसाच्या सुत निर्मितीसाठी निर्णय घ्यावा, शेतकऱ्याच्या कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी तुपकर यांनी यावेळी केली.
अन्यथा दोन दिवसानंतर महाराष्ट्रातील शेतकरी मध्य प्रदेशच्या धर्तीवर आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला. सोयाबीन आणि कापसाच्या दराबाबत नेत्यांना गाव बंदी केली जाईल असं देखील तुपकर यांनी म्हटलं. दोन दिवसानंतर होणार आंदोलन सरकारला हादरवणार असेल असे देखील तुपकर यांनी सांगितले आहे.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या बाबतीत अपयशी आहे. या संदर्भात निर्णय घ्या. तर परळीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात निघणाऱ्या मोर्चात कार्यकर्ते सहभागी होणार आहे.