मराठवाड्यात 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांसह फळबागांना बसला. यामध्ये 18 लाख हेक्टर क्षेत्रपेक्षा अधिक पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. त्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याला सुरुवात झाली आणि सद्यस्थितीला मराठवाड्यात सात लाख वीस हजार हेक्टर वरील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित अकरा लाख हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे ही टक्केवारी ही 39 टक्क्यांवर पोहोचली. मराठवाड्यातील 22 लाख 48 हजार 445 शेतकऱ्यांचं 18 लाख हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांचा प्रचंड नुकसान झालं होतं.
यामध्ये 17 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र हे जिरायत तर 27 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र फळबागांचा होत. दरम्यान नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून कधी मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे.