कांदा चाळ अनुदान धोरणात शासनाकडून बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याला आता वैयक्तिक ऐवजी सामूहिक कांदा चाळ अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयाला मात्र शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे वैयक्तिक कांदाचाळ बांधणाऱ्याला अनुदान मिळणार नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आधीच अनेक शेतकऱ्यांचे कांदा चाळ बांधण्यासाठीचे अर्ज कृषी विभागाकडे प्रलंबित आहेत.
यातच आता या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करण्यावर याचा परिणाम होऊ शकतो.