महेश महाले, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे 853 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 31 ऑगस्टपूर्वीच पीक विम्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे म्हणाले की, जे काही आज एकूण अंतिम कापणी प्रयोगानंतर एक ऐतिहासिक रक्कम या नाशिक जिल्ह्याला जवळजवळ 853कोटी ही 31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबतची माननीय सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक आज पार पडली.