दुसऱ्या लाटेत (covid second wave)बेड मिळत नव्हते, परंतु तिसऱ्या लाटेतील (covid third wave)परिस्थिती दिलासा देणारी आहे. तिसऱ्या लाटेत सध्या रुग्णालयातील (Hospitals) 90 ते 95 टक्के बेड्स रिकामे आहे, अशी माहिती राज्याचे राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली.
जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, "करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले. हॉटेल्स, या परिस्थितीत शासनाकडे जो कर जमा व्हायला हवा, तो होत नाही. लोकांचंही उत्पन्न मोठ्या प्रमाणावर बुडतं, त्यांचंही नुकसान होतं, झळ सोसावी लागते. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, करोना प्रादुर्भावापासून जीविताची सुरक्षा करणंही आवश्यक आहे आणि आर्थिक हानीही होता कामा नये. हे लक्षात घेऊनच महाविकास आघाडी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. कोणतीही विकासकामं त्यामुळे थांबवलेली नाहीत. महत्त्वाच्या बाबी, आवश्यक बाबी, शेतकऱ्यांचं नुकसान, मदत काहीही थांबलेलं नाही. सगळं काही सुरळीत सुरू आहे. महाराष्ट्राची आर्थिक शक्ती तेवढी आहे. याचप्रमाणे पुढेही सर्व काही सुरू ठेवायचं आहे".
ब्रिटन आणि फ्रान्सपासून धडा ध्यावा
ब्रिटन आणि फ्रान्स या देशांपासून टास्क फोर्स (Task Force) आणि केंद्र शासनानं बोध घ्यावा आणि निर्बंध शिथील करण्याबाबत भूमिका घ्यावी, ज्या अर्थी ब्रिटन आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांनी संसदेत भाषण करुन सांगितलं की, आता आपल्याला कोरोनासोबत राहायचं आहे. देशांनी कोरोना बरोबर रहाण्याची मानसिकता करून तेथील निर्बंध शिथील करण्याचं काम केलं आहे.
ग्रामीण भागात कोरोनात वाढ
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "राज्यात तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र राज्यात तिसऱ्या लाटेतसुद्धा सध्या दवाखान्यात 90 ते 95 टक्के बेड्स रिकामे आहेत. तसेच, दवाखान्यात भरती होण्याचं प्रमाण केवळ 5 ते 7 टक्के आहे.