राज्यात कोरोनाचा संसर्ग खालावत चालला आहे. दररोज सापडणाऱ्या आकडेवारीत रुग्णसंख्या कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाढ कमी असल्याने राज्यसरकारसह आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात ६३ हजार ००४ रुग्ण सक्रिय असून आज ६ हजार ६८६ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ५ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ % एवढे झाले आहे.
गेल्या २४ तासात राज्यात १५८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ०७६जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ६७६ व्यक्ती संस्थानात्मक क्वारंटाईनमध्येआहेत. तसेच महाराष्ट्रात कालपर्यंत ४ कोटी ७९ लाख ३८ हजार २५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी १ लाख८३ हजार ५०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.