प्रशांत जगताप, सातारा | माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर 4 कोटी 40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचेच निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनीच हा आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील स्वराज डेअरीला 2007 ते 2017 पर्यंत लाकूड पुरवण्याचे काम आगवणे यांनी केलं. आगवणे यांची साखळवाडी आणि पिंपळवाडी येथील 4 एकर जमिनीवर 236 कोटी रुपयांचे कर्ज खासदारांनी काढले.. त्या बदल्यात स्वराज डेअरीच्या व्हॉइस चेअरमन पद देण्याचे आश्वासन दिले मात्र हे आश्वासन पाळले गेले नसल्याचा आरोप आगवणे यांनी केला आहे.
2015 मध्ये सातारच्या बँक ऑफ पटियाला या शाखेतून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सांगण्यावरून 2 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज काढून दिले. टप्प्याटप्प्याने कर्ज काढून खासदारांना दिले मात्र त्याची परतफेड खासदारांकडून न झाल्याने आगवणे यांना स्वराज नागरी पतसंस्थेचे नोटीस आल्याने कर्जाची रक्कम व्याजासह देण्याची मागणी खासदारांकडे केली, मात्र ते पैसे दिले गेले नसल्याचा आरोप आगवणे यांनी केला. दरम्यान रक्कम न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिगंबर आगवणे यांनी दिला आहे.