India

ट्रॅक्टर रॅली उधळण्यासाठी पाकिस्तानातून ३०० टि्वटर हँडल सक्रिय

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील आंदोलक शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. या रॅलीत गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानातून ३०० टि्वटर हँडल कार्यान्वित करण्यात आली होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. यामुळे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपल्यानंतर ट्रॅक्टर रॅली होईल आणि त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, १३ ते १८ जानेवारी या कालावधीत पाकिस्तानातून ३०८ टि्वटर हँडल अॅक्टिव्ह झाली आहेत. याबाबत विविध यंत्रणांकडून गुप्तवार्ता मिळाली होती, असेही पोलिसांनी सांगितले.

शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश करणार आणि नंतर आपल्या मूळ ठिकाणी परत येईल. तीन मार्गांवर १७० किलोमीटरच्या मार्गांची शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण रॅली शांततेत पार पडावी यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितलं.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय