सध्या राज्यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या (ED) माध्यमातून अनेक नेत्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi)सर्व नेत्यांना धडकी भरली आहे. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय (budget session)अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये खासदार मनीष तिवारी (manish tiwari)यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या (ed)कारवाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला केंद्र सरकारकडून उत्तर देताना काही आकडेवारी सभागृहा समोर ठेवण्यात आली. त्यानुसार ईडी ने २००२ ते २०१४ या काळात ११२ छापे (Raids) टाकले. त्यातून एकूण ५,३४६ कोटी रुपये जप्त केले. तर २०१४ ते २०२२ या काळात ED ने २,९७४ छापे टाकले व त्यातून ९५,४३२ कोटी रुपये जमा केले. असे जरी असले तरी आजवरच्या एकूण ३,०८६ कारवायांमध्ये फक्त २३ जण दोषी आढळले आहेत.
राज्यामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षात अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली. यामध्ये सगळ्यात प्रमुख नाव म्हणजे राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे होय. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुद्धा यासंदर्भात ईडी ने अटक केली आहे. तसेच शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul), खासदार भावना गवळी (Bhavana gavli) यांच्यावर सुद्धा ईडीने कारवाई केली आहे. आणि सध्या हा विषय एवढा चर्चेत यायचे कारण म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणी अटक केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कारवाई मागे केंद्र सरकारची सूडभावना असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपच्या (BJP) नेत्यांनी 'कर नाही तर डर कशाला' अशा स्वरूपाचे वक्तव्य माध्यमांशी बोलताना केले आहे.
नुकताच उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या भाषणामध्ये काही लोक भ्रष्टाचार करतात व त्यांच्यावर कारवाई केली की यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप केले जातात यावर त्यांनी टीका केली होती. त्यामुळेच या विषयाला थेट त्यांच्याशी जोडले जात आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी तिथे सुद्धा अशाच स्वरूपाच्या धाडी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार यातून अडचणीत येऊ शकते असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.