मुंबई आलेल्या तौक्ते चक्रीवादळात बुडालेला 'पी ३०५' तराफा आणि वरप्रदा नौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांची दुर्घटना झाली होती . या प्रकरणी ONGC च्या 3 कार्यकारी संचालक निलंबित करण्यात आले आहे . पेट्रोलियम मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकी नंतर हा निर्णय घेण्यात आला. तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात तराफा दुर्घटनेत ८६ जणांचा मृत्यू झाला.
तौक्ते चक्रीवादळामध्ये 'पी ३०५' तराफा आणि वरप्रदा ही नौका बुडाली होती. या दोन्ही नौकांवर मिळून २७४ कर्मचारी होते. त्यापैकी १८८ जणांना वाचविण्यात यश आले. दरम्यान 'पी ३०५' आणि वरप्रदा यांचा बुडालेला सांगाडा शोधण्यासाठी नौदलाने आयएनएस मकर या कॅटामरान श्रेणीतील नौकेची मदत घेतली. साइड स्कॅन सोनार या रडाराच्या आधारे या बुडालेल्या नौका नौदलाने शोधून काढल्या.