Covid-19 updates

महाराष्ट्रात आज सापडले २ ओमायक्रॉन रूग्ण; पुण्यासह लातूरमध्ये शिरकाव

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रात आज आणखी २ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. यात मुंबईत ५, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे मनपा क्षेत्रात २, कल्याण डोंबिवलीत १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ रूग्ण आहे.

पुण्यात दुबईवरुन आलेल्या महिला डॉक्टरचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांच्या संपर्कातील तीन जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानं थोडासा दिलासाही मिळालाय. महत्वाची बाब म्हणजे पुणे आणि लातूरमधील ओमिक्रॉनची लागण झालेल्या दोघांनीही कोरोना लस घेतलेली होती.

तर लातूर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्णही दुबईवरुन भारतात आला होता. या 35 वर्षीय रुग्णात लक्षणं आढळून आली होती. लातूर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे. परदेशातुन आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आल्यानंतर तो रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. हा रुग्ण औसा इथला रहिवासी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती