देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,33,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 525 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 4,89,409 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणा बाबत घोषणा केली आहे. देशात लसीकरण मोहीम चालू असताना, अनेकांचे लसीचे दोन्ही डोस पुर्ण झाले. देशभरात लसीकरण मोहीमेचे काम चालू असताना अनेक जण लस न घेतल्याचे दिसून येत आहे.
राज्य आणि केंद्र शाषित प्रदेशात आता पर्यत कोविड 19 चे 162.73 कोटी लस पुरवण्यात आली आहे. परंतु अजूनही 13.83 कोटी लस सरकार कडे उरलेली आहे. अशी माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रायलाने दिली आहे. ज्यांनी लस अजून घेतली नसेल त्यांनी लसीकरण पुर्ण करुन घ्या अशी माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रायलाने माध्यमांना दिली आहे."
तिसऱ्या लाटेदरम्यान फक्त 23.4 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज होती. तर दुसऱ्या लाटेत 74 टक्के आणि पहिल्या लाटेत 63 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज होती. रिसर्चमध्ये मॅक्स नेटवर्कच्या सर्व रुग्णालयांमध्ये कोविड-19 मुळे 41 मुलांना दाखल करण्यात आले होते. मात्र या वयोगटातील एकही मृत्यू झालेला नाही. सात मुलांना बालरोग अतिदक्षता विभागात (आयसीयू) तर दोन मुलांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते असं म्हटलं आहे.