राज्यात एकीकडे काही जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे संचारबंदी सारखी काही निर्बंध घातली जात असतानाच, आता मुंबईत देखील अशीच परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे. कारण मुंबईत आज 1 हजार 103 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर मुंबईत दुप्पटीचा दर 238 दिवसांवर आला आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहता प्रशासन निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे.
मुंबईत आज 24 तासांत 1 हजार 103 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 29 हजार 843 झाला आहे. तर कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 11 हजार 487 झाला आहे. तर 654 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट हा 93 टक्क्यांवर आहे. वेळीच होणाऱ्या कोरोना चाचण्यांमुळे तो वाढता ठेवण्यात यश आलं असून आत्तापर्यंत मुंबईत 33 लाख 53 हजार 124 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट आता 238 दिवसांवर गेला आहे. अर्थात आज असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी 238 दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र, त्याचवेळी मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे.