झायडस कॅडिलाच्या ‘ZyCoV-D‘ ला आपत्कालीन वापरास मान्यता

झायडस कॅडिलाच्या ‘ZyCoV-D‘ ला आपत्कालीन वापरास मान्यता

Published by :
Published on

झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या 'जॉयकोव्ह-डी' लसीला केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाने आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. या लसीला मंजुरी मिळाल्याने ही भारतात वापरली जाणारी सहावी लस आहे.

अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती.त्यानंतर लसीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या समितीने जॉयकोव्ह-डीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या लसीला आता मंजुरी मिळाली आहे.

आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com