उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा ‘योगी’ पर्व;२६ मंत्र्यांना डच्चू तर नव्या चेहऱ्यांना संधी
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Uttar Pradesh Cm) म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला. ऐतिहासिक शपथविधी पार पाडल्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची कमान आपल्या हाती घेतली आहे. दरम्यान, यावेळी योगींच्या मंत्रिमंडळामध्ये (Yogi Adityanath cabinet minister) काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून आधीच्या सरकारमधील तब्बल २६ मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय.
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ (yogi adityanath oath ceremony) घेतली. यावेळी योगींच्या मंत्रिमंडळामध्ये काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून आधीच्या सरकारमधील तब्बल २६ मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय.दिवंगत नेते लालजी टंडन यांचे पुत्र आशुतोष टंडन सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येऊनही त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री
सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता नंदी, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल, संजय निषाद.
मंत्रिमंडळातील राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)
नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रविंद्र जायसवाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठोड, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालु.
मंत्रिमंडळातील राज्यमंत्री
मयंकेश्वर सिंह, दिनेश खटीक, संजीव गौड, बलदेव सिंह ओलख, अजित पाल, जसवंत, सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनुप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठोड, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आझाद अन्सारी, विजय लक्ष्मी गौतम.