Zydus Cadila | ऑगस्ट महिन्यापासून होणार झायडस कॅडिला लसीचं उत्पादन

Zydus Cadila | ऑगस्ट महिन्यापासून होणार झायडस कॅडिला लसीचं उत्पादन

Published by :
Published on

भारतीय औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडिला कोविड लसीचं उत्पादन येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. लसीला आपत्कालीन परवानगी मिळावी यासाठी केंद्राला विनंती केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी तशी माहिती दिली आहे.

"ऑगस्ट महिन्यापासून आम्ही झायडस कॅडिला लसीचे प्रति महिना १ कोटी डोस उत्पादित करू शकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यासोबतच, या वर्षी डिसेंबरपासून आम्ही दर महिन्याला झायडस कॅडिलाचे ५ कोटी डोस उत्पादित करू शकू. एका वर्षात लसीचे १० कोटी डोस पुरवणं हे आमचं लक्ष्य आहे", असं शर्विल पटेल म्हणाले आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी लवकरच कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच मंजुरी मिळालेल्या मॉडर्नासोबतच झायडस कॅडिला ही पाचवी कोरोना लस देखील उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com