वाचा , देशातील कोण कोणत्या राज्यात आहे लॉकडाऊन / नाईट कर्फ्यू

वाचा , देशातील कोण कोणत्या राज्यात आहे लॉकडाऊन / नाईट कर्फ्यू

Published by :
Published on

देशभरात कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यांनी कोरोना रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. काही राज्यांनी सक्तीने लॉकडाऊन केला आहे. काही राज्यांनी वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर काही राज्यांमध्ये दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. कोणत्या राज्यात काय परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन
महाराष्ट्रात दिवसाला 50 हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील ज्या क्षेत्रात कोरोनाचा आभाव जास्त आहे त्या जिल्ह्यात आठ-आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लवकरच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्लीत नाईट कर्फ्यू
दिल्लीत रात्री 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी असेल. रात्रीच्या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. लग्न, अत्यंविधी आणि इतर धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मेट्रो प्रवास केवळ 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंजाबात राज्यवापी संचार बंदी
पंजाब सरकारने रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू लावला आहे. चंडीगढ़मध्ये रात्री 10.30 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.

मध्यप्रदेशात लॉकडाऊन
मध्यप्रदेशात कोरोना वाढल्याने राज्य सरकारने इंदूर, विदिशा, राजगड, बडवानी आणि शाजपूर जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालवधी वाढवून 19 एप्रिल करण्यात आला आहे. तर बालाघाट, नरसिंहपूर, सीवनी आणि जबलपूर जिल्ह्यात 22 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल. त्याशिवाय बैतूल, रतलाम, खरगोन आणि कटनीमध्ये 17 एप्रिलपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.

उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू
उत्तर प्रदेशात 30 एप्रिलपर्यंत रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. मेरठमध्ये 18 एप्रिलपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. तसेच गाझियाबाद आणि नोएडामध्ये 17 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.

राजस्थानात नाईट कर्फ्यू
राजस्थानात अजमेर, अलवर, भीलवाडा, चितौडगड, डुंगरपूर, जयपूर, जोधपूर, कोटा आणि आबू रोड येथे 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. तर उदयपूरमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी असेल.

गुजरातमध्ये संचारबंदी
गुजरातमध्ये 30 एप्रिलपर्यंत रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे.

कर्नाटकात संचार बंद
कर्नाटकात बंगळुरू, मैसूर, मंगळुरू, कलबुर्गी, बीदर, तुमकुरु आणि उडुपी-मणिपालमध्ये 20 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे.

जम्मू-काश्मीरात संचार बंद
जम्मू-काश्मीरातील काही भागात शहरी भागात रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहणार आहे.

ओडिशा संचारबंदी
ओडिशातही 5 एप्रिलपासून रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com