“शरद पवार महाराष्ट्र सरकारला लतादीदींचे स्मृतीस्थळ बनविण्यास सांगणार का? राम कदमांचे शरद पवारांना पत्र

“शरद पवार महाराष्ट्र सरकारला लतादीदींचे स्मृतीस्थळ बनविण्यास सांगणार का? राम कदमांचे शरद पवारांना पत्र

Published by :
Published on

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.

याच पार्श्वभूमीवर लतादीदी यांचे स्मारक उभारण्याची मागणी होत आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. 

आता भाजपचे आमदार राम कदम यांनी  शरद पवारांना पत्र लिहिले आहे, राम कदम यांनी पत्रात लिहिले की. "शरद पवारजी तुम्ही देशाचे सर्वात अनुभवी आणि वरीष्ठ नेते असून महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहात. लता मंगेशकर यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याठिकाणी त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे, अशी जगभरातील चाहत्यांची मागणी आहे. ३६ पेक्षा अधिक भाषांमधून ३० हजारांपेक्षा अधिक गाणी गात लतादीदींनी विश्व रेकॉर्ड स्थापन केला. भारतरत्न पुरस्काराने गौरव झालेल्या लतादीदी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला याव्या, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे," त्यामुळे त्यांचं स्मृतीस्थळ शिवाजी पार्कमध्ये बांधण्यात यावं,

हे पत्र राम कदम यांनी ट्विटरवून शेअर करत भाजपाचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सवाल देखिल केला आहे की,  "शरद पवार महाराष्ट्र सरकारला स्वर्गीय लतादीदींचे स्मृतीस्थळ बनविण्यासाठी सांगणार का? आणि माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र सरकार त्यांच्या शब्दाचा सन्मान करणार का?,"

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com