पंजाबमध्ये ‘आप’ विजयी; शिरोमणी अकाली दल, कॉग्रेसचा ‘झाडू’नं पराभव

पंजाबमध्ये ‘आप’ विजयी; शिरोमणी अकाली दल, कॉग्रेसचा ‘झाडू’नं पराभव

Published by :
Published on

पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची (5 State Assembly Election Result) अंतिम मतमोजणी समोर आली आहे. या मतमोजणीत पंजाबचा (Punjab Assembly Election) निकाल स्पष्ट झाला असून 'आप'ने (Aam Adami Party) झाडून कॉग्रेस (Congress) आणि भाजपचा (BJP) पराभव केला आहे. तर आता 'आप'चा (Aam Adami Party) पंजाब राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठी घोषणा केली आहे. राजभवनात नव्हे तर भगतसिंगांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

पंजाब राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी विजयानंतर जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी, "कोणत्याही सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे फोटो नसतील. कार्यालयांमध्ये केवळ शहीद भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असतील," अशी घोषणा केली आहे. तसेच "मी राजभवनात नव्हे तर भगतसिंगांच्या खटकरकलन गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन," अशी घोषणा आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी संगरूर येथे केली.

मी देशभक्त असल्याचे पंजाबच्या जनतेनं सिद्ध केलं – अरविंद केजरीवाल

पंजाब निवडणूकीच्या निकालात आज कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाशसिंग बादल, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू, विक्रमजित सिंग मजीठिया हारले, आज पंजाबच्या जनेतेनं खूप मोठं काम केलंय, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. मी दहशतवादी नाही, मी देशभक्त आहे, हे आज पंजाबच्या जनतेनं सिद्ध केलंय, असं केजरीवाल यांनी म्हटलं."'पंजाब वालो तुस्सी कमाल कर दित्ता', आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करतो. यावेळी पंजाबच्या निकालांनी क्रांती घडवून आणली आहे, अनेक मोठ्या लोकांना हादरे देत तुम्ही खुर्चीवरून खाली उतरवलं," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

नवज्योतसिंग सिद्धूंचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभव

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभव झाला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांचा ६,७५० मतांनी पराभव झाला.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com