India
जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं कौतुक; ‘हे’ आहे कारण
लोकशाही न्यूज नेटवर्क
जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) भारताचं कौतुक केलं आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतानं उत्तम कामगिरी केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं भारताची प्रशंसा केली आहे. भारतानं कोव्हिड-१९वर नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी करून दाखवली, असंही संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ए. गेबरेसस यांनी म्हटलं आहे.
एकजुटीने प्रयत्न करून उपाययोजना केल्यास आपण कोरोनाच्या विषाणूवर सहज मात करू शकतो हे आपल्याला भारताच्या कामगिरीवरून दिसून येतं. आता लसही मदतीला आल्यानं चांगले परिणाम दिसून येतील, असंही संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.
देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर देशात लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये सर्वात आधी कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येत आहे.