India
तांत्रिक बिघाडानंतर व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम पूर्ववत
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे मेसेंजर अॅप काही काळासाठी ठप्प झाले होते. शुक्रवारी रात्री ११ वाजेपासून जवळपास ४५ मिनिटांसाठी दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठप्प झाले होते. यानंतर टि्वटरवर नेटकऱ्यांनी याबाबत तक्रार केली.
सध्या सोशल मीडिया वापरणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यातही व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचे अनेक वापरकर्ते आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही साईट्स बंद झाल्यानं युझर्स नाराज झाले होते. जागतिक स्तरावर ही अडचण झाली होती हे आता उघड झाले आहे.
दरम्यान, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकनं झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. काही तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र, सर्वांसाठी आम्ही ही अडचण दूर केली आहे. झालेल्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगीर आहोत, असं या सोशड मीडिया प्लॅटफॉर्मकडून सांगण्यात आलं आहे.