केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येत आहे. देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शनांना हिंसाचाराचे वळण लागले आहे.
उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये (Bihar) मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या नागरीकांनी रेल्वेच्या (Railway) काचा फोडत डब्यांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत.
या घटनांमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील २२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ५ गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.
बिहारमधील बक्सरमध्ये ‘अग्निपथ’ योजनेला (Agnipath Scheme) विरोध करण्यासाठी तरुण रेल्वे रुळांवर उतरले आहेत.
बिहारमधील जेहानाबादमध्ये नवीन सैन्य (Army) भरती योजनेच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर टायर जाळून निषेध केला जात आहे.