Mother's day 2022: बॉलिवूडमधील आईवर आधारित या 7 चित्रपटांच्या कथा ठरल्या खास
'जज्बा' (Jazbaa) या सिनेमाच्या माध्यमातून ऐश्वर्या रायने (Aishwarya rai) कमबॅक केले होते. या सिनेमात ऐश्वर्या राय एका आईच्या भूमिकेत होती. हा सिनेमा नोकरी करणाऱ्या आईवर भाष्य करणारा आहे. घर आणि ऑफिस एक आई कशी सांभाळते ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे.
हा चित्रपट कोणीच विसरणार नाही. मेहबूब खान( Mehboob Khan)दिग्दर्शित मदर इंडिया या चित्रपटात नर्गिसने (Nargis) कएका असहाय्य आईची भूमिका साकारली होती. जी आपल्या मुलांसाठी जगाशी लढते. यामध्ये आईचं पात्र जेवढं सशक्त दाखवलं गेलं ते क्वचितच इतर कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळालं नाही.
Maatr हा चित्रपट एका अशा आईची कथा आहे जिच्या मुलीवर बलात्कार होतो. पण ही आई ना तुटते ना हरते. प्रत्येक पावलावर ती व्यवस्थेशी लढते आणि तिच्या मुलीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देते. ती एक सशक्त आई आहे, रवीना टंडन(Raveena tandon)या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती.
तुम्ही श्रीदेवीचा(Shreedevi) आणखी एक उत्तम चित्रपट, इंग्लिश विंग्लिश पाहू शकता.यात एक शांत, गोड स्वभावाची गृहिणी तिच्या सुशिक्षित पती आणि मुलीपासून कशी दूर जाते? कारण तिला इंग्रजी बोलण्यात आणि समजण्यास त्रास होतो? हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात श्रीदेवी आणि आदिल हुसैन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अश्वनी अय्यर तिवारी दिग्दर्शित आहे.
'निल बटे सन्नाटा' या सिनेमात स्वरा भास्कर(Swara Bhaskar) ही मुख्य भूमिकेत आहे. हा विनोदी सिनेमा असला तरी या सिनेमात सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमात स्वरा घरकाम करून मुलीचा सांभाळ कसा करते हे दाखवण्यात आलं आहे.
पंगा (panga)हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावरील महिला कबड्डीपटूच्या जीवनावर बनवण्यात आला आहे. यात एका मुलीची कहाणी आहे जी आई झाल्यानंतर पुन्हा खेळाच्या मैदानात येते आणि आपली हरवलेली ओळख जिंकते. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त जस्सी गिल, यज्ञ भसीन, नीना गुप्ता आणि रिचा चड्ढा आहेत. तुम्ही तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
मॉम सिनेमात श्रीदेवी(shreedevi)मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात एका सशक्त आईची कथा मांडण्यात आली आहे. आर्या नावाच्या मुलीची कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे. शाळेतील काही मुले आर्यावर सामूहिक बलात्कार करतात. त्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलते, हे सिनेमात दाखवण्यात आले आहे. श्रीदेवीने या सिनेमात सावत्र आईची भूमिका साकारली आहे.